पुणेकरांची मेट्रोला पसंती ; पहिल्याच दिवशी तब्बल 21 हजार पुणेकरांनी केला मेट्रोतून प्रवास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन दुपारनंतर मेट्रोचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी (citizens) खुला करण्यात आला आहे. यानंतर पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. नागरिकांनी केलया प्रवासातून मेट्रोला पाच लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अनेक नागरिकांनी सहकुटुंब , तरुणांनी मित्रमैत्रिणींच्या सोबत प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटूला. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन) लिमिटेडकडून पुण्यात महामेट्रोच्या (Mahametro) एकूण 32 किलोमीटरच्या मार्गापैकी12 किलोमीटरच्या मार्गावर काल पासून मेट्रो सुरु झाली. मेट्रो प्रशासनाच्या नियोजनानुसार दर अर्ध्या तासाच्या वारंवारितेने मेट्रो धावत आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी पाच स्थानके कार्यान्वित केली आहेत. यामध्ये तीन स्थानकांपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट आणि चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..