शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन :- राजू शेट्टीची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे.
राज्यभर रस्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली.
सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सकाळी फोन आला होता. त्यांनी याप्रश्नी चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. आम्हीही चर्चेबाबत सकारात्मक आहोत. सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे. जोपर्यंत यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. धरणे आंदोलन सुरू ठेवूनच मी चर्चेत सहभागी होणार आहे.
नितीन राऊत उघडा डोळे बघा नीट
दरम्यान राजू शेट्टी यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबूक पेजवरुन नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. शेट्टी म्हणतात, काल दुपारी आण्णासो गिराजे मु. पो. दत्तवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील शेतक-यांच्या शेतीपंपास जवळपास १३ फुट मगरीने वेटोळे घातलेले होते. कदाचित हि वेळ रात्रीची असती तर होत्याच नव्हत झाल असत. आजपर्यंत या मगरीने १ घोडा व अनेक शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. नितीन राऊतजी आतातरी जरा उघडा डोळे बघा नीट ! असेही ते म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….