दहावी बारावीच्या परिक्षा केंद्र परिसरात फिरते आरोग्य पथक तैनात ठेवा :- अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या दक्षता समितीला सूचना ; यावर्षी शाळा तिथे परिक्षा केंद्र ; जिल्ह्यात बारावीचे 353 व दहावीचे 604 परिक्षा केंद्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 26 फेब्रुवारी :- दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याने व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता दहावी बारावीच्या परिक्षा केंद्र परिसरात फिरते आरोग्य पथक तैनात ठेवण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिल्या आहे.
दहावी बारावी परिक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात काल दक्षता समितीची सभा अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी शिवानंद गुंडे, शिक्षण उपनिरीक्षक योगेश डाफ प्रामुख्याने उपस्थित होते.
परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके व विशेष पथके नेमण्यात यावी. परिक्षा केंद्रावर कोणीही मोबाईलचा वापर न करणे, जवळचे झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे तसेच जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
यावर्षी शाळा तिथेच परिक्षा केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात बारावीचे 353 व दहावीचे 604 परिक्षा केंद्र राहणार असून याठीकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपशिक्षणाधिकारी शिवानंद गुंडे यानी बैठकीत सादर केली.
बैठकीला शिक्षण, आरोग्य व पोलीस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..