‘धर्म आणि संस्कृती शिवरायांचे आद्यवचन’ – सोपान कनेरकर ; रामराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती निमित्त जाहीर व्याख्यान.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
‘देश स्वतंत्र करण्यासाठी एका संपूर्ण पिढीने रक्ताचे पाणी केले, तोच देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर असतांना त्याविषयी पुढील पिढी मात्र कमालीची उदासीन दिसते. ‘मी, माझे कुटुंब, माझी नोकरी, माझा धंदा’ या चौकटीपलीकडे जाऊन काहीतरी करण्यास कोणीही उत्सुक दिसत नाही. ‘या देशाचा नागरिक या नात्याने माझी काही कर्तव्ये आहेत’, याचाच सर्वांना विसर पडला आहे. राज्यकर्ते देश लुटत असतांना चहा पितांना त्यांना शिव्या घालण्यापलीकडे जनता काहीही करत नाही.’ जातीपेक्षा राष्ट्रप्रथम ठेवत जगण्याची अनुभूती घ्यावी असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांनी रामराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती निमित्त जाहीर व्याख्यान प्रसंगी सवना येथे केले.
यावेळी कनेरकर पुढे म्हणाले कि , भारतातीलच नव्हे तर जगातील छत्रपती महाराज असे एकमेव राजे आहेत की ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही की नासली नाही की नाडली नाही. महाराजांची शिकवण होती की स्वराज्य आया बहिणींच्या रक्षणासाठी आहे आणि याच स्वराज्यात जर तिचा अपमान होत असेल, तिच्यावर अन्याय होत असेल तर ते स्वराज्य काय कामाचे? त्यांनी स्त्रीला नेहमी उच्च व आदर्श दर्जा दिला मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून का होईना. त्यांनी जेथे जेथे छापे टाकले तेथे केवळ धन हस्तगत केले पण स्त्रिधनाला त्यांनी कधीच हात लावला नाही की कोणाला हात लावू दिला नाही आणि असे कृत्य करणाऱ्याला त्यांनी कधीच दया दाखवली नाही. आपल्या आईच्या पदरात स्वराज्य टाकणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
निर्व्यसनीपणा, निष्ठा आणि स्त्री-सन्मान हे गुण आत्मसात केले तरच ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे
कनेरकर यांनी आपल्या हास्य आणि अश्रूच्या शैलीत सर्वाना मंत्रमुग्ध करून सोडले , आज तरुण-तरुणींमुळे देशाची प्रतिमा डागाळलेली आहे. आजच्या तरुणावर भारताचे भविष्य अवलंबून आहे. या सळसळत्या तरुणाईत अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य आहे. मात्र त्यांना कोणा मार्गदर्शकाची गरज आहे. अन्यथा ते भरकटतील. ही भरकटलेली मुले रेव्ह पार्टी म्हणा किंवा अन्य कोणता नवा पाश्चिमात्य ट्रेण्ड त्यामध्येच अडकून राहतील. पैसा हेच सर्वस्व असलेल्या उच्चवर्णीय लोकांची बातच नको. ‘संस्कार’ हा प्रकारच त्यांना नको. आपली संस्कृती किंवा आपले सणोत्सव यापेक्षा सोयीची जीवनशैली त्यांना जास्त प्रिय असते. या नादात वयात आलेली अल्लड मुले भरकटतात. अशात केवळ मैत्रीखातर जेव्हा सामान्य घरातील तरुण असल्या बडे बापाच्या पोरांच्या सहवासात येतो, तेव्हा हळूहळू आरामदायी जीवनाची थोडीफार तरी चटक लागतेच. काही अघटित घडले तर अब्रू तर जातेच पण त्यातून बाहेर पडण्याचे सगळे मार्गच बंद होऊन बसतात. यासाठी तरुणाईला योग्य वळणावर आणण्यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे.
यामुळे आताच्या गर्भवती मातांनी तर चांगले गर्भसंस्कार होतील,
सदर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त शिवसामान्य ज्ञानस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय जीवनात छत्रपती शिवरायांच्या प्रेरक इतिहासाची उजळणी व्हावी आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कौशल्य प्राप्त व्हावे या हेतूने परीक्षेचे निःशुल्क आयोजन केले होते. शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात रामराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने 3 गटात सदर परीक्षा घेण्यात आली.
शुभम गरुड , ज्ञानेश्वर चव्हाण , हरीश देशमुख,अभिनव सावंत, सत्यजित गायकवाड, आकाश दयाळ, पांडुरंग नहातकर, सुनील रेंगे ,सुमित देशमुख व रामराज्य मित्र मंडळ सवना यांनी व्याख्यानाचे आणि सामान्य ज्ञानाचे आयोजन केले होते.