पेढी – पोखरी परिसरात खुलेआम मटका , गुटखा, दारूची विक्री ; सर्वाधिक अवैध व्यवसायाचा केंद्र ; बीट जमादाराचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ; बीट जमादाराला निलंबित करण्याची नागरिकांची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
तालुक्यात अंशतः बंद झालेले अवैध व्यवसाय पुन्हा फोफावले आहेत.पेढी पोखरी परिसरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.याच क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.मटका ,गुटखा आणि अवैध दारूची विक्री सर्वाधिक वाढली आहे.मात्र याकडे स्थानिक बीट जमादार यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले.तर स्थानिक पोलीस प्रशासनाने यावर मुकसंमती साधली आहे.

एकीकडे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी पुढाकार घेत असताना पेढी -पोखरी परिसरात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. बीट जमादार यांच्या अर्थपूर्ण मधुर संबंधाने अवैध व्यावसायिकांना ,व्यवसाय चालू राहण्यासाठी आर्शिवाद देत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनांना संबंधित बीट जमादाराने घरचा आहेर देत असल्याने चर्चेला उधान आले आहे.

संवेदनशिल क्षेत्र म्हणुन पोलीस दप्तरी नोंद असलेल्या पेढी – पोखरी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याने दारूची मिकळत सहज होत आहेत.दारूच्या आहारी असलेल्या बेवड्यांच्या सहाऱ्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.पोलीस निरीक्षकाचे बीट जमादार यांच्याशी आर्थिक साटेलोटे करून अवैध व्यवसायिकांना जणू काही परवाना देण्यात आल्याचे सध्यस्थितीत पेढी – पोखरी परिसरात चित्र आहे.
सुरू असलेल्या अवैध मटका , जुगार ,गुटखा आणि दारूच्या व्यवसायाने नागरिकांनी संबंधित बीट जमादार आणि पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त आहे.त्यामूळे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….