औरंगाबादेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे रात्री १०.०० ते १२.०० वाजेदरम्यान अनावरण होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाइन सहभागी होतील. तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहेत. क्रांती चौकात ३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलाय. त्यासाठी ३१ फूट उंचीचा चौथरा उभारण्यात आलाय. त्यावर तब्बल ७ मेट्रिक टन वजन असलेला आणि २१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्यामुळं शिवरायांचा पुतळा ५२ फूट उंचीचा झालाय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….