महागावात नगराध्यक्ष पदासाठी आघाडीत बिघाडी ; गडावर शिजला भाजपा – शिवसेना सत्तेचा फॉर्म्युला ; नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या करुणा शिरबिडे विराजमान तर उपाध्यक्ष पदी भाजपा सुरेश पाटील नरवाडे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
नगराध्यक्षपदाच्या निवडीत अखेरच्या क्षणापर्यंत चुरस वाढली होती. महाविकास आघाडीचा डंका पिटणाऱ्या नगरसेवकांनी आघाडीत बिघाड केल्यामुळे शिवसेना व भाजपची सत्ता महागाव नगरपंचायत मध्ये विराजमान झाली आहे.त्यामध्ये काँग्रेसच्या दोन बंडखोर उमेदवारांनी सहकार्य केल्याने राजकारणाला उलटी कलांटनी मिळाली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष करुणा नारायण शिरबिडे यांनी काँग्रेसच्या सुरेखा सुरोशे यांचा ५ मतांनी पराभव करीत नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या.तर उपाध्यक्ष पदी भाजपचे सुरेश पाटील नरवाडे यांची वर्णी लागली आहे.
तत्पूर्वी शिवसेना व भाजपा अलिखित युतीसाठी माहूर गडावरील एका आलिशान हॉटेल मध्ये सत्तेचा कटकारस्थान ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
महागाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ७ जागा जिंकल्या.त्यामध्ये अपक्षाच्या मदतीने काँग्रेसचे संख्याबळ ८ वर पोहचले.त्यापाठोपाठ शिवसेना ५ तर भाजपला ४ जागेवर विजयश्री खेचून आणता आला.काँग्रेसला काठावर बहुमत असले तरी सत्ता मिळविण्यासाठी एका नगरसेवकाची नितांत गरज होती. काँग्रेस ८ आणि शिवसेना ५ असे महविकास आघाडीत सत्तेचे गणित मांडल्या जात होते.त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी
काँग्रेस कडून सुरेखा विनोद सूरोशे , सुनंदा दिलीप कोपरकर ,जयश्री संजय नरवाडे असे तीन नामांकन दाखल झाले होते.तर शिवसेना पक्षाकडून करुणा नारायण शिरबिडे व भाजपा कडून रंजना दीपक आडे यांनी आपला अर्ज दाखल केला.
महविकास आघाडी कडून सत्तेचे गणित जुळवण्यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केल्या गेले.मात्र शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात असल्याने
सुनंदा दिलीप सुरोशे यांना आपले नामांकान अखेरच्या दिवशी मागे घ्यावा लागला.परंतु भाजपा आणि सेनेच्या सत्तेच्या सोयारिकित भाजपच्या नेत्याने मजबूत मध्यस्थी केल्याने काँग्रेसचे प्रयत्न निष्फळ ठरले. राज्यात स्थापित असलेल्या महविकास आघाडी कडून महविकास आघडीचे नगराध्यक्ष करण्याबाबत “व्हीप” काढण्यात आले. मात्र या व्हीप ला महागाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी विगलेच वळण मिळाले. महविकास आघीच्या नगरसेवकांनी व्हीप ला तिलांजली दिली. आणि शिवसेनेने भाजपशी घरोबा करून सत्तेचा संसार मांडला.त्याला काँग्रेसच्या दोन नगरसेवकानी साथ दिली.