समीर वानखेडे यांना मोठा दिलासा ; नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे अनुसूचित जाती आयोगाने दिले आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने शुक्रवारी एका खटल्याची सुनावणी करताना वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
तसेच उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडे अनुसूचित जातीचे असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
त्यानंतर आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने शुक्रवारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आयोगाने समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११,४९९,५०३,५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटिसा पाठवल्या होत्या, पण त्यापैकी कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही.
समीर वानखेडे यांनी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. समीर वानखेडेविरुद्धच एसआयटीने तपास सुरू केल्याचा आरोप आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झाला नाही. त्यानंतर आता सुनावणीत आयोगाने एसआयटी बरखास्त करण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीएससीच्या आदेशानुसार, तक्रारीच्या प्रतीसह काय कारवाई केली, याचा अहवाल राज्याने ७ दिवसांच्या आत आयोगाला सादर करायचा आहे. तसेच महाराष्ट्र राज्य समितीला समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया वेगवान करून महिनाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
फिर्यादीत समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, आपण छापा टाकला होता, त्यात महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा जावई आणि एका चित्रपट कलाकाराचा मुलगा पकडला गेला होता. मी महार समाजातील असल्यामुळे मला धमक्या येत आहेत. माझ्या जातीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले असून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. एनसीएससी मात्र वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी करत आहे. वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अनुसूचित जातींना देण्यात आलेल्या आरक्षणांतर्गत आयआरएस नोकरी मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….