आदित्यनाथांच्या वक्तव्याचे थेट लोकसभेत पडसाद ; विरोधकाकडून निषेध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता न मिळाल्यास राज्य काश्मीर, बंगाल किंवा केरळसारखे होईल, या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद लोकसभेच्या कामकाजात उमटले.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करून योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसचे केरळमधील खासदार टी. एन. प्रतापन यांनी लोकसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. यासोबतच तर लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे विधान लाजीरवाणे असून सभागृहाने याची दखल घ्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही कॉंग्रेसच्या सूरात सूर मिसळला. मात्र सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर बोलण्याची संधी मिळेल, असे सांगून प्रश्नोत्तराच्या तासाला सुरवात केली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्यागाचे हत्यार उपसले.
सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी
काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, आरएसपीने आज सभात्याग केला. या पाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्याही खासदारांनी सभात्याग करून नाराजी व्यक्त केली. या सभागृहातील गदारोळामध्ये बहुजन समाज पक्षाचे खासदार दानीश अली यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी आणि तत्पूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….