‘द ग्रेट खली’ WWE च्या रिंगणातून आता राजकीय रिंगणात ; पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंडीगड :- भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू आणि ‘द ग्रेट खली’ म्हणून ओळखल्या जाणारा दलीपसिंह राणानं भाजपमध्ये प्रवेश केलाय.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 पार्श्वभूमीवर त्यानं भाजपचा झेंडा हाती घेतलाय. याबाबत एएनआय वृत्त संस्थेनं माहिती दिलीय. खलीचा भाजप प्रवेश पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
खली हे मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. पंरतु, ते जालंधर येथे काॉन्टिनेन्टल रेसलींग अॅकडमी चालवतात. या अॅडकमीच्या माध्यमातून युवांना कुस्तीचं प्रशिक्षण देतात. खली राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. तसेच ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याआधी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. मात्र, काल त्यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांची भेट घेतली. ज्यामुळं खलींच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक वाढली होती. आज अखेर त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय.
प्रंतप्रधानांच्या कामामुळं भाजपमध्ये प्रवेश
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खली म्हणाला की, भाजपमध्ये प्रवेश करून मला खूप चांगलं वाटतंय. तो म्हणाला की, डब्लूडब्लूईमध्ये मला नाव आणि संपत्तीची कमी नव्हती. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात आपणही का सहभागी होऊ नये? असा विचार माझ्या मनात आला. भारताला पुढे नेण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यामुळं प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जर पक्षानं भविष्यात मला कोणतीही जबाबदारी दिली तर मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न असेल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….