लता मंगेशकर यांच्या नावाने मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन होणार ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संगीत विद्यालय स्थापन होणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात हे विद्यालय स्थापन होणार आहे.
यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूदही करणार आहे.
लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी होत होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कात मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लता दीदींचे स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतीलच त्याची मागणी करण्याची गरज नाही असे म्हटले होते. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्काचे स्मशानभूमी करू नका अशी प्रतिक्रिया दिली होती. आता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला असून लता दीदींच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असेही राज्य सरकारने म्हटले आहे.
६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षा निधन झाले. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती, तर नंतर न्युमोनियाची लागण झाली. ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहरुख खान, रणबीर कपूर, जावेद अख्तरसह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..