रोहित पवारांनी घेतली नारायण राणेंची भेंट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली.
तसेच भाजपच्या आणखी एका आमदाराची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? ही भेट कशासाठी होती? याबाबत स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी नारायण राणेंसोबतचा फोटो ट्विट केला आहे. तसेच नागपुरातील कामठी मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबतचा एक फोटो देखील ट्विट केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील बारा बलुतेदार व पारंपरिक हस्त कारागिरांसाठी केंद्र सरकारच्या (SFURTI) योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात खर्डा, जवळा किंवा नान्नजमध्ये मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणेंची भेट घेतल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
माझ्या मतदारसंघात परंपरागत व्यवसाय करणारे अनेक हस्तकारागीर व बारा बलुतेदार आहेत. मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू झाल्यास ते तयार करत असलेल्या वस्तुंना चालना मिळेल आणि हक्काची बाजारपेठही उपलब्ध होईल. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन राणेंनी दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भागवत कराडांचीही भेट –
रोहित पवारांनी यापूर्वी भाजप केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांची देखील भेट घेतली होती. मतदारसंघातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा अधिक प्रमाणात सुरू करुन सर्वसमावेशक बँकिंग सेवा वाढवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर या प्रक्रियेत मोठी प्रगती झाली आहे. आणखी राज्य स्तरीय बँकींग समितीद्वारे (SLBC) अंतर्गत या सुविधांसाठी मान्यता द्यावी, अशी विनंती रोहित पवारांनी भागवत कराडांना केली. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..