भाजप विरोधात काँग्रेसचं राज्यभरात माफी मांगो आंदोलन करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसकडून आज राज्यभरात मांफी मागो आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातील भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे.
भाजप नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होते. देशाच्या दुरावस्थेला काँग्रेसच जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. या भाषणादरम्यान मोदींनी जवाहरलाल नेहरूंच्या धोरणावरही टीका केली होती.
नेहरुंना स्वतःच्या आंतरराराष्ट्रीय छबीपायी गोव्यात सैन्य पाठवले नाही आणि त्यामुळे गोवा दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिला. काँग्रेसमुळे देशाला आणीबाणीला सामोरं जावं लागले, अशी टीका मोदींनी केली.
याशिवाय देशात कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे पंतप्रधान मोदी राज्यसभेत म्हणाले होते. कोरोना काळात महाराष्ट्रातून ट्रेनभरून लोक महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार इ.ठिकाणी जात होती. त्यामुळे देशभरात कोरोना पसरला असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विविध वक्तव्यांविरोधात देशभरातील काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभरात भाजपविरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. तसेच भाजप नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..