मविआ सरकारला घरचा अहेर ; बच्चू कडूंनी भाजपाच्या मदतीने केला “आघाडी” चा पराभव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चाकूर (जि.लातूर) :- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कपिल माकणे व उपनगराध्यक्षपदी भाजपचे अरविंद बिराजदार यांची निवड झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सहा, महाविकास आघाडीचे आठ व भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत.
बुधवारी (ता.नऊ) अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडी करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करीम गुळवे यांना आठ व प्रहार जनशक्ती पक्षाचे कपिल माकणे यांना नऊ मते पडली. तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भागवत फुले यांना (Latur) आठ व भाजपचे अरविंद बिराजदार यांना नऊ मते पडली.
नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा उपविभागीय अधिकारी श्री. फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने मराठवाड्यात पहिल्या नगरपंचायतीमध्ये भाजपच्या सहकार्यातून पक्षाचा झेंडा फडकावला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, दिलीपराव देशमुख, रामचंद्र तिरूके, विठ्ठलराव माकणे, बालाजी पाटील, गोविंदराव माकणे प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनीही नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..