मिनीमंत्रालयाच्या निवडणुकीचा उडणार “धुरळा” ; इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 16 पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.
कच्च्या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेचे 8 गट, तर पंचायत समित्यांचे 16 गण वाढणार आहेत. प्रशासकीय स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही नांदी समजली जात असून, लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ. गो. जाधव यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविले आहे. 2022 चा महाराष्ट्र अधिनियम सुधारित तरतुदीनुसार जिप व पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना सध्या जिल्हाधिकार्यांच्या पातळीवर तयार करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला आहे. तो तपासणीकरिता राज्य निवडणूक कार्यालयाने मागविला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेची हार्ड व सॉफ्ट कॉपी, नकाशे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या 61 जिल्हा परिषदेचे गट आहेत. आता ही सं’या आठने वाढणार आहे. त्यामुळे जिप गटसं’या एकूण 69 होणार आहे. पंचायत समितीचे 122 गण असून आता त्यात 16 गणांची वाढ होणार असून आता एकूण गणसं’या 138 होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात जिल्हा परिषदेची मुदत संपत आहे. त्यामुळे काही दिवस जिपचे काम प्रशासकांच्या हाती जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
जिप गट, तसेच पंस गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक’म जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकारणाला वेग येण्याची शक्यता असून, आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..