एमआयएमशी यूती नाही , असे म्हणत प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसबरोबर जाण्याचे संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- एमआयएमशी यूती नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी युतीची शक्यता फेटाळली आहे.
औरंगाबाद येथे शनिवारी (ता.पाच) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आल्यास आपण तयार आहोत. बंडातात्या कराडकर यांनी काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. भाजपच्या बारा आमदारांचे निलंब रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. काँग्रेसने हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका मांडली. तर दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीने भूमिका मांडली नाही.
महापालिका अस्तित्वात नसताना कर कशाला भरता? पालिका प्रशासनाने कर वसुली सक्तीची केली तर औरंगाबादकरांनी न्यायालयात जावे, असा सल्ला प्रकश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जाहीर करावे, अशी मागणी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..