पुण्यात किरीट सोमय्याना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की ; पायऱ्यावरुन कोसळले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भाजपनेते माजी खासदार किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावर अनेकदा स्वपक्षातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
त्यातच आज सोमय्या यांना पुण्यात शिवसेनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या किरीट सोमय्या यांना आयुक्ताची भेट न घेताच परतावे लागले. सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.
सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराने आले. त्यानंतर जुन्या प्रवेशद्वारात असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत अडविले. त्यानंतर सोमय्या त्यांना भेटले. मात्र सोमय्या नवीन इमारतीत आल्याचे कळताच सर्व शिवसैनिक प्रवेशद्वारात आले आणि त्यांनी त्याची वाट अडवली.
त्यानंतर काही समजण्याच्या आताच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले तसेच मारहाण करण्यात आली. शिवाय गाडीवर लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. त्यामुळे सोमय्या यांना जीव मुठीत घेऊन गाडीत बसावे लागले.
यावेळी शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत गाडीवर आदळआपट केली. त्यातून ताफा कसा बसा बाहेर निघाल्यानंतर पुणे महापालिकेच्या आऊट गेटवर गाडी अडावत आंदोलकांनी पुन्हा गाडीवर जोर जोरात बुक्क्या मारत गोंधळ घातला. हा गोंधळ जवळपास पाच ते दहा मिनिट सुरू होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..