आमदार नितेश राणेची तब्येत बिघडली ; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणानं देशभर गाजत आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात सध्या भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
न्यायालयीन कोठडीनंतर नितेश राणेंची जिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांची तब्येत बरी नसल्यानं लागलीच राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. नितेश राणे यांची कोठडीत रवानगी होण्याऐवजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
नितेश राणे यांच्याकडून न्यायालयात प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांनी युक्तीवाद केला. सतीश मानेशिंदे यांनी बऱ्याच मोठ्या केसेस हाताळल्या आहेत. अशात त्यांनी नितेश राणेंना पोलीस कोठडीत आणखीन काळ नेण्यात येऊ नये असा युक्तीवाद केला होता. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय दिला आहे.
दरम्यान, नितेश राणेंना संतोष परब हल्ला प्रकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी वकिलांनी नितेश राणेंना पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आता नितेश राणेंना जामीन मिळणार का? , असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..