गेल्या 24 तासात 124 पॉझिटिव्ह ; 259 कोरोनामुक्त ; एक मृत्यू ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1566
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 03 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 124 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 259 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1518 व बाहेर जिल्ह्यात 48 अशी एकूण 1566 झाली आहे. त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1525 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1118 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 124 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78004 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74644 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1794 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेली २२ वर्षीय महिला यवतमाळच्या मोठे वडगाव परिसरातील आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 124 रूग्णांमध्ये 59 महिला व 65 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील आठ, बाभुळगाव सात, दारव्हा नऊ, दिग्रस 27, घाटंजी एक, कळंब नऊ, महागाव चार, नेर एक, पुसद आठ, राळेगाव पाच, उमरखेड एक, वणी तीन, यवतमाळ 34, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 21 हजार 782 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 43 हजार 490 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 11.09 आहे तर मृत्यूदर 2.30 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1713 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 734 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..