बजेट मधून मिळाला एवढा मोठा भोपळा ; राहुल गांधींची खोचक प्रतिक्रिया…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. देशाच्या अर्थसंकल्पातील तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो, त्यामुळे बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं.
एकीकडे गेली दोन वर्षे देश कोरोनाच्या संकटामुळे देश होरपळून निघालेला असताना आर्थिक आघाड्यांवर मोठ्या समस्यांना दोन हात करावे लागत आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेतहे बजेट सामान्यांसाठी झिरो बजेट (Union Budget) ठरलं असल्याची टीका विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत या बजेटबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. या बजेटमधून अक्षरश: ‘शून्य’ मिळाला असल्याचं ठाम मत त्यांनी मांडलंय. त्यांनी आपल्या ट्विटची सुरुवातच ‘M0di G0vernment’s Zer0 Sum Budget!’ म्हणजेच ‘मोदी सरकारचे झीरो सम बजेट’ अशी केली आहे. या बजेटमधून पगारी नोकरदार वर्गाला, मध्यम वर्गाला, गरीब आणि वंचित घटकांना, तरुणांना, शेतकऱ्यांना आणि लहान आणि मध्यम उद्योगांना काहीच मिळालं नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता यावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर ट्वीट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प कोणत्याही बाजूने सामान्यांच्या बाजूने नाहीये, अशी बोचरी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….