पुन्हा पाऊस ; राज्यातील उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये 3 फेब्रुवारीपासून पाऊसाची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हवामान (Weather) विभागाचा अंदाजानुसार राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
तर राज्यातील नाशिक, नागपूर , पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर या भागांमध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे. मुंबईत 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर नागपुरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….