महाराष्ट्र प्रमाणे यूपी मध्ये ही शिवभोजन थाळी देण्याची अखिलेश यादवांची घोषणा ; यूपीत ही मिळणार १० रूपयात जेवन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- पुढील काही दिवसांत पाच राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेट तापले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांकडून नव्या नव्या घोषणा केल्या जात आहेत.
महाराष्ट्र सरकारप्रमाणे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही दहा रुपयांमध्ये (Meals for 10 rupees) गरिबांना थाळी (Shivabhojan thali) देण्याची घोषणा केली आहे. सोबतच त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. (Akhilesh Yadav announces Shivbhojan Thali)
निवडणुका म्हटल्या की प्रचार करणे व मतदारांना प्रलोभन देणे आलेच. निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारे आपल्याकडे आकर्षित करण्याचा नेत्यांचा व पार्टीचा प्रतत्न असतो. गरिबांना मोफत धान्य असो, शेतकऱ्यांसाठी ५० टक्के वीज बिलात सवलत असतो किंवा अन्य कोणतेही गोष्ट… याद्वारे मतदाराने आपल्याला मत द्यावे याचा प्रयत्न केला जातो.
तसेच निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून जाहीरनामा काढला जातो. याद्वारे पक्षाद्वारे कोणते कार्य केले जाणार याची माहिती दिली जाते. याद्वारे म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने मतदार आपले मत वेगवेगळ्या पक्षाला देत असतो. हेच लक्षात घेऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गरिबांना दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा (Shivabhojan thali) केली आहे.
अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणात सोशल कँटीन, किराणा दुकान उघडणार असल्याचे सांगितले आहे. अखिलेश यादव यांनी शनिवारी (ता. २९) मोठ्या घोषणा केल्या. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास सोशल कॅंटीन सुरू केले जातील. हे कँटीन गरीब लोकांसाठी असतील. तसेच तेथे किराणा दुकानही उघडले जातील. सोशल कँटीनमध्ये नागरिकांना १० रुपयांच्या (Meals for 10 rupees) थाळीनुसार जेवण (Shivabhojan thali) दिले जाणार आहे. यासोबतच त्यांचे सरकार भाव धरणाचे धोरणही राबवणार असल्याचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शिवभोजन थाळी लोकप्रिय
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून शिवभोजन थाळीची (Shivabhojan thali) घोषणा करण्यात आली. याअंतर्गत गरिबांना फक्त दहा रुपयांत पोटभर जेवण मिळू लागले. कोरोना काळात ही थाळी गरिबांसाठी निःशुल्क होती, हे विशेष… यामुळे गरिबांची जेवणाची चांगलीच सोय झाली होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….