धनंजय मुंडेना मोठा धक्का ; काँग्रेसने भाजप सोबत केला घरोबा लवकरच सत्ताही स्थापन करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड, 26 जानेवारी :- राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या केज नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसचा धक्का बसला आहे.
काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आले असून लवकरच सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले.
(पांढऱ्या केसांमुळे उडवली जायची खिल्ली, आता त्याच केसांचे आहेत अनेक चाहते) केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु, यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. परंतु, यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन करणार आहेत. (Bollywood celebrity करतायेत मुंबई पोलिसांचं कौतुक; खास आहे कारण) ‘आपलं गाव आपलं सरकार’ ही संकल्पना घेऊन आम्ही आता गावात विकास काम करू असेही यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले. यावेळी अंकुशराव इंगळे, पशुपतीनाथ दांगट, प्रकाश भन्साळी, शकील इनामदार, दिलीप गुळभिले, हाजी मौला सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….