मतदानातून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 जानेवारी :- मतदारांनी चांगले शासन तयार करण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडणून द्यावे. संविधानाने मतदारांना मतदानाची शक्ती दिली आहे. ही शक्ती ओळखून कोणत्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी प्रत्येक निवडणूकीत मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिवसानमित्त जिल्हा प्रशासनातर्फे जाजू कॉलेज येथे आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे, तहसिलदार कुणाल झाल्टे, जाजू कॉलेज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, प्राचार्य दिनेश चांडक उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवमतदार वाढले आहे. निवडणूक साक्षरतेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाची नोंद शासनाने घेतली आहे. हे टिमवर्क मुळे शक्य झाले असून यात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्वांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तस्कीन फातेमा, निकिता धुमणे, विनायक चावरे, शेख इरशाद या नवमतदारांना इपीक मतदार छायाचित्र ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेते तनुश्री मुरतकर, श्रद्धा घाडेकर, अमृता यावरी, देव्यानी दुधे, दादाजी किनकर, भाग्यश्री गहुकार, तुषार खडेकर, मिनाली रहाटे, तनया देशमुख, समृद्धी अलोणी, बोधीसत्व खंडेराव, रिद्धी कांडूरवार यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शैलेश काळे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कुणाल झाल्टे, नायब तहसिलदार आर. बी. बीजे, ग्रामसेवक शेख उस्माण, ऑपरेटर अमित मोगरकर यांचा जिल्हास्तरावर उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला.
*मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे निवडणूक विभागातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती विभागातून यवतमाळच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला संजय गोरलेवार, अतुल शिंगरवाडे, शितल पाटील, निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जाजू कॉलेज येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….