जिल्ह्यात “एक गाव एक दिवस मोहिम राबवा” ; कृषी धोरण २०२० चा प्रचार-प्रसार वाढवा :- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत ; जिल्ह्यातील ऊर्जाविकासाचा घेतला आढावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 जानेवारी :- शेतकरी हिताचे धोरण अंमलात आणूनही जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी या धोरणात सहभागी होत नसल्याचे दिसून येत असून याचे कारण शोधावे. त्यांना कृषी धोरणाची माहीती देण्यासाठी व वीज ग्राहकांच्या इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हयात ” एक गाव एक दिवस” सारख्या मोहिमा राबविण्यात याव्यात, तसेच मुकूटबन येथील १३२ केव्ही उपकेंद्र व चालू असलेली कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महापारेषण विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
वणी येथील बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात काल झालेल्या झालेल्या महावितरण, महापारेषण आणि महाऊर्जा विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरण नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के, महाऊर्जाचे उप महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, अधिक्षक अभियंते सुरेश मडावी, दिलीप खानंदे, हरीश गजबे, मुकेश तट्टे, गोविंद जाधव, प्रमोद पखाले यांच्यासह कार्यकारी अभियंते नरेंद्र कटारे, भारतभूषण औगड, सचिन जीवने उपस्थित होते.
यावेळी ऊर्जामंत्री यांनी विविध कामाचा सविस्तर आढावा घेतला. कृषी धोरणाचा आढावा घेतांना जिल्ह्यातील कृषी थकबाकीच्या १४४७ कोटी पैकी निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफ करून येत्या ३१ मार्चपुर्वी ग्राहकांनी लाभ घेतल्यास कृषी ग्राहकांना ६७ टक्क्यांपर्यंत माफी देणारे व शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणारे हे धोरण असल्याचे शेतकऱ्यांना पटवून देण्यात यावेत, अशा सुचना त्यांनी दिल्या. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेत उभ्या पीकामुळे आतापर्यंत न देता आलेल्या (HVDS) योजनेतील १२७६ वीज जोडण्या आता तत्काळ देण्याचे निर्देश दिले. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जिल्ह्यात ८८३ वीज जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी, या योजनेत आणखी वीज जोडण्या देणे शक्य असल्यास तसे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयांना सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात महापारेषणच्या देवळी – घाटोडी २२० केव्ही, पांढरकवढा – वणी २२० केव्ही या अती-उच्च दाब वीज वाहिन्यांचे काम सुरू असून मुकूटबन येथे १३२ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करून त्याचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी मुख्य कार्यालयात पाठविल्याची माहिती महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के यांनी यावेळी दिली. तसेच १३२ के केव्ही पांढरकवढा उपकेंद्राची क्षमता वाढ करून येत्या मार्च पर्यंत त्याचे रूपांतर २२० केव्ही उपकेंद्रात होणार असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंता मस्के यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….