राज्यात 86 कोरोनाबांधिताचा मृत्यु , नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 33 हजार 914 नव्या रुग्णांची भर पडली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 86 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 20 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.07 टक्के आहे. सध्या राज्यात 16 लाख 20 हजार 371 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईकरांना दिलासा, रुग्णसंख्येतील घट कायम, 1 हजार 815 नवे कोरोनाबाधित
राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 184 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 556 झाली आहे. तर मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….