राज्यातील महाविद्यालय पुन्हा सुरु होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच देशातील कोरोना आणि ओमिक्राॅन आकडेवारी पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध लावले होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अशातच आता कोरोना रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने मुलांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून शाळा आणि महाविद्यालये खुली करावी, यासाठी भाजपने आंदोलने केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाविद्यालये खुली करताना काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना नियमांचं पालन करावं लागणार आहे. दुसरीकडे दोन्ही डोस न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….