आर्णी शहरात खडबड ; सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून रिव्हॉल्वर चोरी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आर्णी : यवतमाळातील आर्णी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरून रिव्हॉल्वर आणि सात राऊंडची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभू गव्हाणकर, असे त्या सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नेहमी प्रमाणे ते मॉर्निग वॉक करीत घराबाहेर पडले. त्यांच्या घरातील दिवाणाच्या खाली रिव्हॉल्व्हर ठेवलेली होती. परंतु, चुकीने गव्हाणकर यांच्या हाताने घरातील दुसरा दरवाजा उघडा राहिला आणि चोरटयांनी आपला डाव साधला. चोरटयांनी त्यांची रिव्हॉल्व्हर व सात राऊंड त्यांच्या घरातून चोरी केले.
आर्णी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालायाच्या मागे सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी प्रभू गव्हाणकर राहतात. नजरचुकीने घरातील दुसरा दरवाजा उघड राहिल्याने त्यांच्या घरून अज्ञात चोरटयांनी रिव्हॉल्वर आणि सात राऊंडची चोरी केल्याची तक्रार त्यांनी केली असता अज्ञात चोरट्यांन विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या गंभीर प्रकाराबद्दल पोलीस तपास करीत आहे. तसेच, गव्हाणकर यांनी आत्मसंरक्षनासाठी हा परवाना घेतला होता. या घटनेने संपूर्ण आर्णी शहरात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….