“भाजपा-शिवसेना ची छुपी युती होती” :- बालेकिल्ल्यातील पराभवानंतर एकनाथ खडसेचा आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव : निमशहरी महाराष्ट्राचा भाग असलेल्या राज्यातील १०६ नगर पंचायतींपैकी ९७ पंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले.
मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला तुलनेने फटका बसला आणि तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तर मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. यातच अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती, असा आरोप केला आहे.
शिवसेनेचा झालेला मोठा विजय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
शेवटी पराभव तर पराभवच आहे
एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगले यश मिळाले आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचे चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने २२, काँग्रेस २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे. सर्वाधिक ३८४ जागा भाजपने जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ३४४, शिवसेनेने २८४ तर काँग्रेसने ३१६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….