केजरीवालांची पंजाबसाठी घोषणा ; मुख्यमंत्री पदाचे उमेदवाराचे नाव केले जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली.
उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३ ,२७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतांनाच आता ‘आप’ने पंजाबमधील निवडणुकांसाठी आपला उमेदवार घोषित केला आहे.
यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी माहिती दिली असून याविषयी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.

दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संग्रुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते तेथील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आता भाजप आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणता उमेदवार घोषित केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….