उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने मागितली खंडणी ; ६ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून केला अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे त्यांचा स्वीय सहायक (पी.ए.) बोलत असल्याचे भासवून बांधकाम व्यावसायिकाला धमकावून २० लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यातील दोन लाख घेण्यासाठी आलेल्या ६ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
यापूर्वीही फसवणुकीचे प्रकार
यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने अनेकांना फोन करून लाखो रुपये उकळण्यात आले होते. पुणे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली होती. त्यांनी पुणे, पिंपरीतील किमान १० ते १२ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. खासदार अमोल कोल्हेंच्या नावाने एका बिल्डरकडेही निधीची मागणी करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….