यवतमाळ मध्ये साडेसात लाखाचे 96 किलो चंदन जप्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावात अवैधरित्या चंदनाची झाडे तोडून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे.
या कारवाईत 95 किलो 730 ग्रॅम चंदन अंदाजे किंमत सात लाख 65 हजार रुपयांचे जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. दशरथ सूर्यभान नोगमोते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चंदन केले जप्त
चापडोह जंगल शिवारातून चंदनाची झाडे अवैधरित्या तोडून यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावातून तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने आणि वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेतात जवळ सापळा रचला. या शेतातून दोन इसम पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले. वनविभाच्या व पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्या जवळील पोत्यातून 51 चंदनाच्या झाडाचे तुकडे व चंदन झाडाचे बुंदे आढळून आले. याचे मोजमाप केले असता 95.730 किलो चंदनचा साठा केला जप्त केला.
फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु
जप्त केलेले चंदन 7 लाख 65 हजाराचे असल्याची माहिती वनविभागाच्या फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..