मोदीजी , तुम्ही जे पेरले तेच उगवले :- नाना पटोलेंची टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भाजप राजकीय रंग देत आहे.
वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले. पंजाबमधील शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
पंतप्रधानांचा ताफा अडवल्याबाबत पटोले म्हणाले की, पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते. त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमामुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते; परंतु अचानक त्यात बदल करून ते रस्तेमार्गाने निघाले. भाजप व मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, याची त्यांना जाणीव असेलच.
सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा
सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करीत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जीविताला नेहमीच धोका राहिला आहे. तरीही सोनिया गांधी, राहुल गांधी जनतेत सामील होतात, सुरक्षेची चिंता न करता सामान्य लोकांमध्ये मिसळतात.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….