राज्यातील सर्व विद्यापीठे , संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारी पर्यंत बंद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत.
तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हि माहिती दिली.
१३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालये, विद्यापीठांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत –
– १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कॉलेजे बंद राहतील.
– सर्व अकृषी विद्यापीठांसोबत खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू राहील.
– या कालावधीत शिक्षण ऑनलाइन होईल.
– काही कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरुंनी त्यांची सोय करावी.
– गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत नेट जोडणीची अडचण असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात.
– कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात.
– सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.
– मात्र परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतिगृहात राहू शकणार आहेत.
– विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसतील तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.
– पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे.
– दहावीच्या एलिमेंटरी, इंटरमिडिएट चित्रकला परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार. या परीक्षा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येतात.
– शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल. ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….