राज्यमंत्र्यांनी बीजेपीच्या आमदारांना राष्ट्रवादीत येण्याची दिली “ऑफर”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळं चांगलेच प्रसिद्ध आहेत.
त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार गोरेंना थेट ऑफरच देऊन टाकलीय. त्यामुळं राजकीय समीकरणं बदलणार का? अशी चर्चा रंगलीय.
बारामतीत डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्घाटन अजित पवारांनी केलं. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उद्घाटन उरकून अजित पवार निघून गेले होते. जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरेंनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
हाच धागा पकडत दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच त्यांना ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी ‘तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ,’ असे ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा. त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरला. बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने आता पुन्हा काही राजकीय समीकरणे बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..