१ जानेवारीपासून राज्यातील सर्व शासकीय वाहनं इलेक्ट्रिक असणार ; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेची १ एप्रिल २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. पण, आता १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

पर्यावरण विभागाकडून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय काही पावलं घेत आहे.राज्यातील सर्व सरकारी वाहन इलेक्ट्रिक असणार.या साठी शासनाने काही योजना देखील राबविल्या आहेत.तसेच २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा इलेक्ट्रीक वाहनांचा असेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..