भारतातील पहिली एलएनजी प्रदुषणमुक्त बस नागपुरात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- ग्रोव्हिजन प्रदर्शनात असलेल्या या दोन्ही प्रदुषणमुक्त वाहनांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
प्रदुषणमुक्त (pollution) भारतातील पहिली एलएनजी (LNG bus) बस नागपुरात बनविण्यात आली आहे.
तर बायो-सीएनजीवर(bio-cng) चालणारा ट्रॅक्टर सुद्धा लॉन्च करण्यात आला. रेशीमबागवरील(reshimbaug) ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात असलेल्या या दोन्ही प्रदुषणमुक्त वाहनांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. डिझेल आणि सीएनजीवरील बस आपण पाहिली असेल. मात्र एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस)वर चालणारी पहिली बस नागपुरात तयार केली आहे. महिंद्रा कंपनीची(mahindra company) ही बस डिझेलवर चालत होती. मात्र ‘रॉमेट’ या कंपनीने डिझेलचे रुपांतर एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये केले. उमरेड रोडवर या कंपनीचा प्रकल्प आहे. ऑटोमोटीव्ही चौकात सीएनजीचा प्रकल्प आहे. तर वाडी येथील १० नंबर नाक्याजवळ असलेल्या प्रकल्पात कंपनीने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर केले. ११ लाख रुपयांची ही किट आहे. या किटने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर करता येते.
भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात
५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते. गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते. डिझेल जळत नसल्याने प्रदुषण होत नाही. त्यामुळे ही बस पूर्णपणे प्रदुषणमुक्त आहे.
बायो-सीएनजी ट्रॅक्टरची उत्सुकता
डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. तो कमी करण्यासाठी ‘रॉमेट’ या कंपनीने बायो-सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर बनविला आहे. ५६० रुपयांच्या एका सिलेंडरवर हा ट्रॅक्टर ३ तास चालतो. एका सिलेंडरमध्ये ८ किलो बायो-सीएनजी गॅस असते. या गॅसचे पंप सर्व ठिकाणी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल, अशी शक्यता कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. देशाचा पहिला बायो-सीएनजी ट्रॅक्टर या ठिकाणी लॉन्च केला आहे. बायो-सीएनजीची ६० हजार रुपयांची किट आहे. कोणताही डिझेलवर चालणारा ट्रॅक्टर ही किट बसविल्याने त्याचे बायो-सीएनजीमध्ये रुपांतरीत होते. प्रदुषणमुक्त असलेल्या या ट्रॅक्टरची उत्सुकता सध्या शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे.