आव्हानात्मक घटनेचा उलगडा : अखेर तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घरात पाण्याच्या टाकीत सापडला, तिघे नातेवाईक ताब्यात ; हत्येचा संशय
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसानं समोर आव्हान उभे होते.एलसीबी, फिंगर, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक, सायबर सेल अशी सर्व पथकं रात्री घटनास्थळी दाखल आणि शोध कार्य सुरू झाले.त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ या घटनेचे गुड उकळण्यासाठी गावात तळ ठोकून होते.दिवसरात्र पोलिसांना कानमंत्र देत होते.
पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील कुऱ्हा या गावात तळ ठोकुन होते. त्यावेळी टिपलेले छायाचित्र
अखेर चिमुकलीच्या घरात पाण्यातील टाकीत तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना हत्येचा हत्येचा संशय असल्याने कुटुंबातील तीन नातेवाईकांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.मृतक चिमुकलीचा मृतदेह आर्णी येथील शवविच्छेदनगृहात पाठवले आहे. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालानंतर तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.
नातेवाईकांवरच हत्येचा आरोप :
नातेवाईकांनीच चिमुकलीची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. तीन वर्षांच्या मुलीला आधी धान्याच्या डब्यात कोंडण्यात आले, त्यानंतर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरुम जवळ आणून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपासानंतर पोलिसांनी तिच्या तीन नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिची हत्या करण्यात आली, याचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.