पुढील आठवड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दिवाळीपाठोपाठ इंग्रजी नववर्षाच्या स्वागतालाही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याच्या शक्यतेने बळिराजाची धास्ती वाढली आहे.
दिवसभरात कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर उर्वरित राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील थंडीचा जोरही सध्या ओसरला असून, अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात एक ते दीड अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिवाळ्याच्या या दिवसांत आता पुन्हा पावसाचे मळभ दाटल्याचे दिसत आहे. त्यामुळे बळिराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. वायव्य व मध्य भारतातील शीतलहरींच्या स्थितीत घट होत आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम व मध्य भारतासह बहुतेक भागात किमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने तापमान वाढीची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात २८ डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस बरसण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील. तर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुरूपाचा पाऊस होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील हवामान मात्र कोरडे राहील, असा अंदाज आहे. तसेच २७ डिसेंबरला विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभरात राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३२.६ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे दहा अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….