विधानसभा अध्यक्ष पदा साठी काँग्रेस कडून हे तीन नावे चर्चेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज बहुप्रतिक्षित विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्र जाहीर झाला. येत्या २७ आणि २८ डिसेंबरला ही निवडणूक होत आहे.
विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाले होते.
मात्र मध्यंतरी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. यंदाच्या अधिवेशनात सभागृहाला नवा अध्यक्ष मिळणार का अशी चर्चा सुरु होती. अखेर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. २७ आणि २८ डिसेंबरला ही निवडणूक होईल.
या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तीन नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. यात संग्राम थोपटे , पृथ्वीराज चव्हाण आणि केसी पाडवी यांचा समावेश आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करायचा आहे. तर मंगळवारी निवडणूक होईल.
दरम्यान, माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रीमंडळात सामावून घेतले जाईल अशी चर्चा सुरु आहे. त्यांना एका वरिष्ठ मंत्र्याचे खाते मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..