विधानसभा अध्यक्षांची निवड होणार पुढील आठवड्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- निवडणुकीची नोटिस १० दिवसांवरून १ दिवसावर आणणारी सुधारणा आज विधानसभेने पारित केल्याने येत्या अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळू शकेल. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांनी घोषित करायची असल्याने तशी विनंती करणारा मंत्रिमंडळाचा ठराव राजभवनाकडे पाठवला जाणार आहे.
आज ही निवडणूक २७ तारखेला घ्यायची की २८ ला याचा निर्णय मंत्रिमंडळ घेईल. यासंबंधीची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने केल्यानंतर ती राज्यपालांना मान्य करावी लागेल.
या अधिवेशनात रिक्त झालेले आमचे पद भरून द्या असा आग्रह काँग्रेसने लावून धरला होता. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज नियम समितीची बैठक घेण्यात आली. खुल्या मतदानाचा स्वीकार आणि पूर्वसूचना १० दिवसांवरून एक दिवसावर नेण्याच्या बदलांवर तब्बल ४३ आमदारांनी आक्षेप घेणाऱ्या शिफारसी केल्या होत्या. त्या आज नियम समितीत बहुमताने फेटाळून लावण्यात आल्या. मविआच्या ४ सदस्यांपुढे नियम समितीतील भाजपची तीन ही संख्या कमी पडली. भाजपच्या समितीतील अन्य सदस्यांचे निलंबन झाले आहे.
सभागृहात हा अहवाल
सादर झाल्यावर तो आवाजी मतदानाने पारित झाला तर नियम धाब्यावर बसवत असल्याचा आक्षेप घेत भाजपने सभात्याग केला. सत्तारुढ आघाडी नियमानुसार या निर्णयाचे राजपत्र छापणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तारीख ठरवून तशी शिफारस राज्यपालांना केली जाईल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….