शालार्थ आयडीतूनही तुकाराम सुंपेनी केली कमाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्य शासनातर्फे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर वेतन सुरु करण्यासाठी शालार्थ आयडी घ्यावा लागतो. कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याचे काम परीक्षा परिषद आयुक्त आणि पुणे विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष तुकाराम सुपे (tukaram supe) याच्याकडे होते. शालार्थ आयडी मिळवण्यासाठी अनेक शिक्षक पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या खेटा मारत होते. परंतु, चिरीमिरी घेतल्याशिवाय शालार्थ आयडी क्रमांक मिळत नव्हता. त्यामुळे सुपे याने टीईटी परीक्षेसह (TETExam scam) शालार्थ आयडी देण्याच्या प्रक्रियेतूनही लाखोंची कमाई केली आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले.
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे. त्यामुळे येथील काही कागदपत्र तपासल्यास त्यातून शालार्थ आयडी प्रकरणाचे धागेदोरे मिळू शकतात. तसेच शालार्थ आयडी देण्याचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यास सुपेबरोबर गंगाजळी जमा करण्यात आणखी कोण कोण होते. हे असे समोर येऊ शकते, असेही सुत्रांनी सांगितले.
तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले-
पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. या आरोपींनी तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट समोर येत असल्याने खळबळ माजली आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती. सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..