अधिवेशना आधी महाविकास आघाडीची तातडीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्यापासून राज्याच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता, मुंबईतच होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन मुंबईतच घेत असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
याच अधिवशनाच्या आधी महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलवली आहे. उद्या सकाळी 9 वाजता अधिवेशाला सुरूवात होण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे.
अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची शक्यता
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे हाच मुद्दा अधिवेशनातही गाजण्याची शक्यता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, राज्यात सुरू असलेला परीक्षांचा घोळ आणि पेपरफुटी, हाही मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून वारंवार परीक्षा घोळाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरूनच जोरदार घमासान पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच दारू आणि पेट्रोलवरील टॅक्सचा मुद्दाही या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सुरू असलेला एसटीच्या संपाचा मुद्दाही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. कारण कालच अजय गुजर यांनी संप मागे घेतला आहे, तर काही भागातील एसटी कर्मचारी अजूनही विलीकरणावर ठाम आहेत, त्यामुळे या मुद्द्यावरूनही विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येऊ शकतात.
अधिवेशनातील सरकारची रणनिती ठरणार
अधिवेशना सरकारची रणनिती काय असणार, यावर चर्चा होणार आहे. गेल्या अधिवेशनात झालेला हायव्होल्टेज ड्रामा पाहता यंदाचे अधिवेशनही अशाच काही मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवशनाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत विरोधकांना थोपवण्यासाठी सरकारचा प्लॅन काय असणार? याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….