ऐश्वर्या रायची ईडीच्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आले होते.
तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते, यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली. येथे ऐश्वर्याची साडेपाच तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ईडीने नुकतीच अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.
फेमाप्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स 9 नोव्हेंबर रोजी ‘प्रतिक्षा’ म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर १५ दिवसांत उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ईमेलद्वारे ईडीला उत्तरही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये ईडी, आयकर विभाग आणि इतर एजन्सींचाही समावेश आहे.
नेमकं काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण?
पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे (Mossack Fonseca) लिगल दस्तऐवज लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Suddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. यात भारतासह 200 देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यात 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत 300 भारतीयांची नावे होती. यात ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच पळपुट्या विजय माल्याच्या नावाचाही समावेश होता.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….