2 वर्ष काय टाळ कुटत होते का…? पंकजांचा धनंजय मुंडेना थेट सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड, 19 डिसेंबर :- नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धंनजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहात मग 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? असा जळजळीत सवाल पंकजांनी थेट धनंजय मुंडेंना विचारला आहे. बीड (beed) जिल्ह्यातील वडवणी इथं नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
निवडणुकीच्या प्रचारसभेत 100 कोटींची घोषणा केली. पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार, असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा समाचार घेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सगळं माझ्याच्या गळ्यात आलं पाहिजे हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का?
कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबानी शिकवलं नाही’ अरारारा खतरनाक! पठ्ठ्याने कमालच केली ; पाहून भलेभले पडले गार तसंच, ‘धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातीच प्रतिक्रिया नाही, मग कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ, पण आमची दुकानं चालली पाहिजे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं आहे’ अशी टीकाही पंकजांनी केली. पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? ‘हे’ घटक ठरतील महत्वपूर्ण या सरकारचं भविष्य फार चांगलं नाही, यांचा कबाडा होणार आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, तर याचे कबाड निघणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….