समाज माध्यमांवर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 18 डिसेंबर :- कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, व्देषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले आहेत.
सदर आदेशात निरनिराळे धार्मिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सर्वाजनिक प्रशांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदयान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव, अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखादया समुहातील व्यक्तींना दुस-या कोणत्याही वर्गाविरुध्द किंवा
समूहाविरुध्द कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.
विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती, संस्था, संघटना हा अॅडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर अॅडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त
राहील.
आदेशाची अवज्ञा करणा-यांवर भारतीय दंड संहिताच्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..