शरद पवार यांच्या भाषाणांच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत व प्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या हस्ते ‘नेमकेचि बोलणे’ या खंडाचं प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संपादक डॉ. सुधीर भोंगळे, पत्रकार अनंत बागाईतकर, रंगकर्मी शंभू पाटील, किशोर कदम, चिन्मयी सुर्वे, संदीप मेहता, मनस्विनी लता, हेमंत टकले आदींसह शरद पवार, प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, नबाब मलिक, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
श्री. पवार यांच्या भाषणाचा संपादित अंश यावेळी पाच लोकांनी वाचला. जळगावच्या शंभू पाटील यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना भूमिपूजन कार्यक्रामत श्री. पवार यांनी केलेल्या भाषणाचे वाचन केले. यानंतर त्यांनी थेट पवार यांना प्रश्न विचारला, ‘आपण आता ज्या कालखंडात आहोत, तो कालखंड अत्यंत भिन्न आहे. येणाऱ्या काळाची लढाई केवळ राजकीय नाही, तर सांस्कृतिक देखील आहे आणि जर ही लढाई सांस्कृतिक असेल, तर यासाठी आपण काही तयारी केली आहे का? हा बदल पचवण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे का?’ यावेळी श्री. पवार यांनी कारखान्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी घडलेल्या गमतीदार गोष्टी सांगत परिवर्तनासाठी मी नेहमीच तयार असतो. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अतिशय वेगळ्या धाटणीचा व दर्जेदार कार्यक्रम अतिशय झोकात संपन्न झाला असं सगळ्याच मान्यवरांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..