राहुल गांधीच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणारा का…? गृहमंत्र्यांचं सूचक विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- येत्या २८ डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी राहुल गांधी शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.
सरकारने एमआयएमच्या सभेला देखील परवानगी नाकारली होती. त्यात आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी काँग्रेसने शिवतीर्थावर अनेक सभा घेतल्या. मात्र, राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळाली तर ही शिवतीर्थावरील त्यांची पहिलीच सभा असणार आहे. यापूर्वी २००३ आणि २००६ साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शिवतीर्थावर सभा घेतली होती.
राहुल गांधींच्या सभेवरून ओवैसींचा निशाणा –
एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांची शनिवारी मुंबईत सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच एमआयएमकडून तिरंगा रॅली काढण्यात आली. पण, त्याला राज्य सरकारने ओमिक्रॉनचे संकट आहे, असं सांगून विरोध केला होता. परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही रॅलीचे आयोजन आणि सभा घेतल्याने काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ओवैसींनी राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का? असा सवाल केला होता. त्यांच्या सभेला परवानगी मिळेल आणि त्याठिकाणी सत्तेच्या चर्चा होतील, अशी टीकाही ओवैसींनी केली होती.
राहुल गांधीच्या सभेला परवानगी मिळणार का? –
राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणार का? याबाबत सूचक विधान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. एमआयएमच्या मुंबईतील सभेला परवानगी दिली नव्हती. जे नियम एमआयएमसाठी होते तेच नियम राहुल गांधी यांच्या सभेसाठी असतील, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यामुळे राहुल गांधीच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..