ICMR आणि NIV ची नवी कोरोना टेस्ट ची रिपोर्ट मिळणार आता ३० मिनिटांत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :- इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) यांनी कोरोनासाठी नवीन चाचणी विकसित केलेली आहे. या चाचणीमुळे फक्त ३० मिनिटांत टेस्टचा रिपोर्ट मिळणार असून तपासणीचा खर्चही कमी येणार आहे. फक्त डोळ्यांची चाचणी करुन कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे सांगता येत असल्याने विमानतळ, रेल्वे, मॉल अशा किती तरी ठिकाणी हे टेस्ट किट वापरता येणार आहे.
टेस्टला RT LAMP असे नाव देण्यात आले आहे. या चाचणीसाठी महागडी यंत्रणा तसेच कुशल मनुष्यबळाचीही गरज नाही. ही मॉल्येक्युलर बेस्ड तंत्रावर आधारित आहे. कोरोनाचा कोणता व्हॅरिएंट आहे, हे जरी ही चाचणी सांगू शकत नसली तरी या चाचणीमुळे देशातील एकूण कोरोना चाचण्याचा वेग मात्र वाढणार आहे. ICMR – NIVच्या मुंबई युनिटने ही टेस्ट विकसित केलेली आहे.चेन्नई आणि दिल्ली येथील कंपन्यांना हे तंत्रज्ञान देण्यात आले असून त्यांना टेस्ट किट विकसित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. येत्या २ आठवड्यांत या चाचण्या विमातळावर सुरू केल्या जाणार आहेत.चेन्नईतील Acrannolife Genomics आणि दिल्लतील रॅपिड डायग्नॉस्टिक ग्रुप या चाचणीसाठीचे किट विकसित करत आहेत.