सोयाबीनची उगवण शक्ती चे प्रात्यक्षिक व शेतक-याना टाकळी ता.माहूर येथे क्रूषी विभागाकडून मार्गदर्शन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माहूर (राजकीरण देशमुख) :- तालुक्यातील टाकळी येथे तालुका कृषी कार्यालया तर्फे तालुका कृषी अधिकारी बी. बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड करणे अगोदर सोयाबीन बियाणे उगवणशक्ती याचे पडताळणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. टाकळी येथील शेतकरी राजू विष्णू काळे, अरविंद रमेश काळे, सौ ललिता अरुण काळे, राम विजय काळे, यांचे घरी सोयाबीनच्या बियाण्यांची गोन पाट ओला करून करून त्यावर सोयाबीनचे शंभर बिया अंतर अंतर अंतरावर ठेवून गोण पाट गुंडाळून त्यावर दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा पाणी टाकून चार ते पाच दिवसांनी किती टक्के बियाणे उगवण होऊन अंकुर निघालेले पहावे . 70% बियाण्याची उगवणशक्ती असल्यास पेरणीस योग्य बियाणे समजावे त्यानंतर पेरणी करावी प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक श्रीमती के व्ही दामोदर यांनी करून दाखविले. यावेळी कृषी पर्यवेक्षक वाय.वाय.दळवी, मंडळ कृषी अधिकारी व्ही.एस. कदम, यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीला आळा घालून शक्यतोवर बीबीएफ यंत्राने पेरणी करावी अशी माहिती देण्यात आली त्याच बरोबर कृषी विभागाच्या महा डीबीटी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित शेतकरी कमल किशोर अडकिने,भगत,फय्याज फारूकी,महेंद्र घाळवट यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते. क्रूषी विभागाने अशा प्रकारच्या बियाने उगवनशक्तीच्या कार्यशाळा गावोगावी घ्याव्यात व शेतक-याना शेतीविषयक मार्गदर्शन करावे अशी मागनी शेतक-यामधून होत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….